खानापूर रोडवरील ५ कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
कारंजा लाड दि 24 कारंजा हुंकार
कारंजा तालुक्याती ग्राम खानापुर येथील माऊली कृृृृषी केंद्राचे संचालक मुकिंदा वावगे यांनी त्या कुटुबियांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले .
खानापुर रोडवर खेर्डा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला हे कुटुंब २ महिन्यापासुन आपला व्यवसाय करण्यासाठी आलेले होते. त्या कुटुंबात लहान मुलासहीत जवळपास २५ व्यक्ती आहे. मात्र कोरोना व्हायरस मुळे लाॅकडाऊन असल्याने त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे.. ते निर्वासीत असल्याने त्यांच्याकडे ओळखपत्र, रहिवाशी दाखला नाही त्यामुळे शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.. त्यांना माऊली क्रृषी केंद्राचे संचालक मुकिंदा पाटील वावगे यांच्याकडून प्रत्येकी ५ कुटुंबाला अन्नधान्य व स्वयंपाकाचा किराणा देण्यात आला...
त्या ५ कुटुंबांनी आम्हाला मदत करावी अशी त्यांनी हाक दिली. त्याच्या हाकेला ओ देत माऊली कषी केंद्राचे संचालक मुकिंदा वावगे यांनी आपल्याला काहीतरी देणे लागते त्यामुळे त्यांनी मदती करीता पुढे येत त्या कुटुंबियांना मदत केली .व ईतर नागरिकांनी पुढे येवुन अशा नागरिकां मदत करण्याचे आवाहन माऊली कृृृषी सेवा केद्राचे संचालक मुकिंदा वावगे यांनी केले आहे