वार्ताहर
काजळेश्वर उपाध्ये : कारंजा तालूक्यातील ग्रामकाजळेश्वर उपाध्ये येथे रेशन दूकान समोर दि .१० एप्रील रोजी काजळेश्वर जी .प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांनी कोरोणा संसर्ग टाळण्याकरीता ग्रामस्थांना मासचे वाटप केले यावेळी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग कोरोना नियंत्रन पथका ची लोकप्रतिनीसह उपस्थीती होती .
प्राप्त माहिती नुसार दररोज कोरोणा बाधीतांचा आकडा महाराष्ट्रात वाढत असून जिल्ह्यात
कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये करीता खबरदारी दक्षता घेणे हेच आपले हाती असल्याने काजळेश्वर सर्कलमधील ग्रामस्थांना खबरदारी म्हणून शासनाचे आदेशाचे पालन करा घरातच राहून आपण व आपले कूटूंब कोरोणा संसर्गापासून सुरक्षित ठेवा . गरजेसाठी बाहेर पडायचे असल्यास मास वापरा असे जीप . सदस्य अशोकराव डोंगरदीवे यांनी सांगून उपस्थित ग्रामस्थांना मासचे वाटप केले या प्रसंगी पं.स. सदस्यं रंगराव धुर्वे ;ग्रा.प. सदस्य राजू उपाध्ये ;जमीर भाई बॅकप्रतिनीधी नंदू उपाध्ये ;सामाजीक कार्यकर्ता रामा बंड ग्रामसचिव आर .आर. मुळे '' आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे ग्रा .प. कर्मचारी ;आरोग्य कर्मचारी पो . पाटील इत्यादी मान्यवर उपस्थीत होते .
काजळेश्वर येथे कोरोणा संसर्ग रोकण्यासाठी जी.प. सदस्याकडून मासचे वाटप .