संचारबंदी चे उल्लघन केल्याप्रकरणी नवं वर, वधु - वर गुन्हा दाखल.
धनज बु।प्रतिनीधी — अंकुश कथे ( कारंजा हुंकार) )
धनज बु।। पो.स्टे. अंर्तगत येत आलेल्या ग्राम पिंपळगाव बु।। येथे आज दि 20 एप्रिल ला..सकाळी 8.30 वाजता मुस्लिम समाजाचा विवाह झाला..परंतु चार लोकांच्या व्यतिरिक्त जास्ती चे लोक तिथे आणल्यामुळे व जिल्हाबंदी तसेच संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला..
सदर माहिती अशी आहे की, पिंपळगाव बु।। येथील रहिवासी सै.शौकत सै. सैदू यांची मुलगी हजराणा परवीन (वय 20) हीचा विवाह अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी सै. रशीद सै. सैदहु यांचा मुलगा सै. मुजीब सै. रशीद याचा शी आज दिनांक 20 एप्रिल ला झाला .परंतु कोरोना व्हायरस मुळे सर्व देशांत संचार बंदी आहे..तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्ह्यच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिलेले असून सुद्धा अशा प्रकारे जिल्हाबंदी तसेच संचार बंदी चे उल्लंघन केले जात असल्याचे धनज पोलिसांच्या निदर्शनात आले असता त्यांनी नवं वर -वधू सह आणखी मौलवी हमीद खान शेर यांचा वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या विवाहास फक्त चार व्यक्तींची पर्वानगी होती..परंतु प्रत्येक्षात येथे चार पेक्षा अधिक लोक असल्याचे पिंपळगाव बु।। येथिल पोलीस पाटील सौ .संगीता राऊत यांचा निदर्शनास आल्याने त्यांनी या विषयी माहिती धनज पो. स्टे ला कळविली त्यानुसार वरील सर्वान वर कलम 188, 269 व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...या विषयी पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांचा मार्गदर्शनात बिट जामदार रामचवरे, सुनील तिवाले, शिवाजी ठवकर करत आहे