सर्वांनाच मोफत गॅसचे वितरण व्हावे,
राहुल रविराव यांची मागणी
(कारंजा लाड)
कोरोनच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे संचारबंदी लागु असतांना सर्वांचेच आर्थिक बजेट कोलमडलेले आहेत. तसेच ग्रामीण भागात लॉक डाउन सुरू होण्याआधीपासून हाताला काम मिळत नसल्याने मजुर वर्ग पैश्याअभावी अडचणीत असतांना गॅस धारकांना गॅस भरून आणणे शक्य होत नाही.शासनाकडून उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस ची सुविधा असल्याने इतर गॅस धारकांना ही या सुविधाचा लाभ देण्यात यावा , वास्तविक सर्वच लोक लॉक डाउन मुळे आर्थिक अडचणीत असल्यामुळे इतरांनाही मोफत गॅस मिळावे अशी मागणी समाजसेवक राहुलभाऊ रविराव यांनी केली आहे .