आदीवासी गोंड समाजाच्या व्यथा ;अडचणी समजून त्यांना सुरक्षीतता देण्यासाठी त्यांच्या प्रती शासन प्रशासनाने सकारात्मक दृष्टी ठेवा .
आदीवासी समाजगाव प्रमूख पंचायत समीती सदस्य
— रंगराव धुर्वे यांची मागणी .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
.: कारंजा तालूक्यातील ग्राम काजळेश्वर येथे आदिवासी गोंडसमाजाची बहूल् वस्ती मोठया प्रमाणात आहे . हा समाज भटकंती करणारा असून जडीबूटी व्यवसाय करूण उदरनिर्वाह करतो . लोक साधे आहेत त्यांना समजून घ्या आणि उघड्यावर
कंटूबासह राहणाऱ्या माझ्या आदीवासी बांधवांना राहतांना सुरक्षीतता वाटावी करीता शासन प्रशासन गावकरी यांनी त्यांच्या प्रती
सकारात्मक दृष्टी ठेवावी अशी मागणी येथील आदीवासीगोंडसमाजाचे माजी' सैनिक पंचायत समीती सदस्य रंगराव धुर्वे यांनी प्रशासनास केली आहे .
पुढे बोलतांना रंगराव धुर्वे म्हणाले की आमच्या आदीवासी समाजात शिक्षीताचे प्रमाण अल्प आहे . उदरनिर्वाहाकरीता भटकंती करावीच लागते उघडयावर पालात तंबू ठोकूण कुटूंबासह निवारा असतो तेव्हा घराला दारच नसते घरात मुलीबाडी तरुण मुली महीला आई
बहीनी असतात .गोंडी पेहराव त्यांचा असतो उदरनिर्वाहासाठी जडीबूटी विकणे ;मनुक्का विकणे हा व्यवसाय
करतात . सद्दा लॉक डाऊनमुळे भटकंती ;फिरस्ती वर असणारे सर्व समाज बांधवगावात आले आहेत आमच्या महीलावर माय बहीनीवर
कोणी टवाळखोर ;गुंडगीरी करणाऱ्यांची वाईट नजर पडू नये . समाज अडाणी जरी असला तरी भ्रमंतीमुळे जग ओळखून आहे तेव्हा आम्ही तुमचाच एक भाग आहोत आम्हाला आपलेपणाने वागवा आमचे समाज बांधवा प्रती सकारात्मक दृष्टी सर्व घटकांनी ठेवावी असे मत आदीवासी समाजाचे गावचे प्रमुख माजी सैनिक पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांनी व्यक्त केले .