धनज खु. येथे अवैध रित्या दारू विक्री .
एका विरुद्ध गुन्हा दाखल,
कामरगांव पोलीसाची कारवाई
कामरगांव प्रतीनीधी मुन्ना उटवाल ( कारंजा हुंकार )
येथुन जवळ च असलेल्या धनज खु येथे अवैध रितीने दारू विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार कामरगांव पोलीस उपनिरीक्षक कपिल मसके व चमुने टाकली असता गजानन विठ्ठल राव इंगळे यांच्या विरुद्ध ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल मसके, जमादार रविंद्र राजगुरे, जमादार श्यामल ठाकुर, सुनील टाले करित आहे.