पालघर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,
वैदर्भीय नाथ समाज संघाचे वाशीम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार )
गडचिंचले, ता. डहाणू, जिल्हा-पालघर येथे दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत 1) कल्पवृक्ष गिरी, वय 70 वर्ष, 2) सुशील गिरी वय 35 वर्ष व कार ड्रायव्हर 3) निलेश तेलगडे रा. मुंबई. हे त्यांचे गुरु महंत राम गिरी यांच्या अंत्यविधीसाठी मुंबई वरून सुरत, गुजरात कडे जाण्यासाठी निघाले असता कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले गावामध्ये अज्ञात लोकांनी त्यांची गाडी पलटवुन संतांना लाथा बूक्क्यानी व दगडांनी मारहाण केली या सर्व घटनेची माहिती तेथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांने रात्री जवळपास 11:00 वा. कासा पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संतांना व ड्रायव्हर ला पोलिसच्या गाडीत बसवले. परंतु स्थानिक जमावाने हतबल पोलिसांच्या समोर पोलिसांच्या गाडीची तोड फोड करून संतांना व ड्रायव्हरला गाडी बाहेर काडून लाठी, दगड, लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने मारत त्यांचा जीव घेतला. या सर्व घटने बद्दल आम्ही वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो.
पोलिस स्टेशन मध्ये या घटनेचा गुन्हा क्र. 77/2020 कलम 302, 120, 427,147,148,149 या प्रमाणे नोंद करण्यात आलेला आहे.
सदर घटनेबद्दल आमच्या नाथपंथीय समाजात अतिशय रोष पसरला आहे. सदर घटनेचा शासनाचे वतीने योग्य तपास करून संधीत गुन्हेगाराना फाशी शिक्षा होणे बाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. आपण या घटनेत जातीने लक्ष द्यायची आपणास विनंती करण्यात येत आहे