अमोल कीर्दक यांनी गीताच्या माध्यमातून केली कोरोना विषयी जनजागृती
कारंजा प्रतिनिधी .नरेंद्र बोरकर . कारंजा हुंकार
कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये या साठी सर्व स्तरावरून ठिकठिकाणी उपाययोजना सोबतच प्रशासन जनजागृती करीत आहे .राज्यातील नागरिक सुध्दा कोरोनाची खबरदारी म्हणून समाजात जनजागृती करण्याचे काम करत आहे .कुणी गझल च्या माध्यमातून तर कुणी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे .दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कामरगांव मध्ये वास्तव्यास असेलेले सुप्रसिद्ध गायक अमोल कीर्दक यांनी गीताच्या माध्यमातून सर्व जनतेला घरीच राहण्याचा संदेश दिला आहे .