कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामरगावात सॅनिटायझर टनेल कार्यान्वित
ग्रा.पं. प्रशासनाकडून घेतली जाते नागरिकंाची काळजी
कामरगांव प्रतिनिधी — मुन्ना उटवाल ( कारंज हुंकार कारंजा पं.स अंतर्गत येत असलेल्या कामरगाव गा्र पं प्रशासनाच्या वतीने कामरगाव कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची 19 एप्रिल रोजी निर्मिती करून कार्यान्वित करण्यात आले. शिवाय कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर घ्यावयाची खबरदारीच्या उद्देशाने गावात आतापर्यंत दोनदा जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली असून नागरिकंाना कोरोना संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे व कोरानापासून बचाव करण्याचे आवाहन स्थानिक सरपंचा सुरेखा देशमुख यांच्यासह 0ग्रा पं पदाधिकाÚयांनी व सचिवांनी केले आहे. देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. या पाश्र्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे सॅनिटायझर टनेल कार्यान्वित करण्यात आले. कामरगावातील बसस्थानकापासून गावात येणाÚया रस्त्यावरील जि प विद्यालयासमोर हे टनेल कार्यान्वित करण्यात आल्याने प्रवेश करणाÚया नागरिकांना निर्जंतुक करण्यास मदत होईल. यावेळी जि प सदस्या मिनाताई भोने , पं स सदस्या शबाना परवीन मयानोद्दीन सौदागर, पोलीस पाटील नितीन शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन सरोदे, व्यावसायिक प्रमोद शर्मा यांच्यासह स्थानिक सरपंचा सुरेखाताई देशमुखसह उपसरपंच मोसीयोद्दीन जहीरोद्दीन, आनंदा फेंडर व रंणजीत देशमुख यांची उपस्थिती होती.