शाळेत तांदूळ वाटपासाठी आलेल्या मुख्याध्यापकास कोरोनाची बाधा
- मूळचा अमरावती येथील रहिवासी
कारंजा लाड दि २६ कारंजा हुंकार
कारंजा लाड तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेतील मुख्याध्यापक यांनी २ एप्रिल रोजी शालेय पोषण आहारातंर्गत तांदूळ वाटप करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्या मुख्याध्यापकाणे २०० पालकांंना तांदूळ वाटप केले. दरम्यान तो ३ शिक्षक व एका खिचडी शिजवणाऱ्या तसेच एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती आज प्रशासनाला प्राप्त झाली. त्यास मागील आठ दिवसासापूर्वी त्रास झाला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी अमरावती येथील सरकारी रुग्णालयात तपासणी दरम्यान त्याला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तो कामरगाव येथील ज्या लोकांच्या संपर्कात आला, त्या लोकांची आरोग्य व महसूल विभागाने आज, २६ एप्रिल रोजी गावातील २०० कुटूंबातील सदस्यांची प्राथमिक तपासणी केली. जे शिक्षक थेट संपर्कात आले, त्या शिक्षकांना व महिलेला वाशीम येथे आज रात्री पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.सविस्तर असे की अमरावती येथिल रहिवासी असलेला मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा कामरगाव येथे कार्यरत आहे. शासनाच्या सुचने प्रमाणे शाळेतील शालेय पोषण आहार वाटपासाठी तो २ एप्रिल रोजी शाळेत आला असता त्यांनी शाळेतीळ तांदूळ काही विद्यार्थी व पालकांना वाटप केले. त्यामुळे तो त्याच्या संपर्कात आला तसेच २ शिक्षिका कामरगाव येथील, १ शिक्षक कारंजा येथील व १ महिला खिचडी शिजवणारी व ज्या व्यक्तीने अमरावती येथे पोहचून दिले असे एकूण ५ व्यक्ती त्यांच्या थेट संपर्कात आल्याने आज महसुल व आरोग्य यंत्रणेने २०० कुटूंबाच्या प्राथमिक सर्वेक्षणास सुरुवात केली. मात्र कोणालाही तश्या प्रकारचा त्रास दिसून आला नाही. मात्र ५ व्यक्ती जे संपर्कात आले त्यांना तपासणी करिता आज, २६ रोजी वाशीम येथे पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, तहसीलदार धीरज मांजरे व गटविकास अधीकारी कालितास तापी, आरोग्य अधिकारी डॉ किरण जाधव, ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी कामरगाव येथे भेट देऊन माहीती घेतली.