उमेद ग्रामसंघ , मेहा च्या वतीने सर्व गावकऱ्यांना मास्क चे वाटप....
( कारंजा हुंकार )
धनज बु।।....धनज बु ।। येथून 3 किमी अंतरावर असलेल्या मेहा येथील उमेद ग्रामसंघ या महिलांच्या संघाने स्वखर्चातून मास्क बनवून गावातील सर्व नागरिकांना ते निशुल्क वाटले...कोरोना सारख्या महामारीतून स्वतःचे व गाव चे रक्षण कारण्यासाठी मेहा येथिल उमेद ग्रामसंघच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे..आता पर्यंत जवळपास 500 ते 600 मास्क या ग्रामसंघ ने बनवले आहे.अकरा बचत गट मिळून हा उमेद ग्रामसंघ बनला आहे...अजून मास्क बनवण्याचे काम या संघाकडून केले जात आहे....संघाच्या अध्यक्षा सौ.उषा कडू सचिव रोहिणी मेश्राम, नंदा मनवर , रेखा सराटे , दीपा मुळे या सर्व महिलांनी पुढाकार घेत हे मास्क बनविले आहे...त्यांचा या कार्याविषयी सर्व गावातून कौतुक होत आहे....
उमेद ग्रामसंघ , मेहा च्या वतीने सर्व गावकऱ्यांना मास्क चे वाटप....