कारंजा येथे गॅस बुकिंग करिता सोशल डिटन्स चा वापर
ठाणेदार सतीश पाटील यांच्या मागर्दशनाखाली चोख बंदोबस्त
कारंजा लाड ( कारंजा हुंकार ) दि. १७ कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व महसूल विभागा प्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावून शहर वासीयांची काळजी घेत आहे. कर्तव्य म्हणून जरी असले तरी ते सामान्य नागरिकांचा गर्दी झाल्याचा जरी फोन आला. तरी त्या ठिकाणी आपली पोलिसांची फौज काही वेळातच पाठवल्या जाते. त्याप्रमाणे कारंजा येथील भारत गॅस बुकिंग करिता होत असलेली गर्दी लक्षात घेता. या ठिकाणी ठाणेदार सतीश पाटील यांच्या मागदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख लावून त्या ठिकाणी आलेले ग्राहक सोशल डिटन्सिंगचा वापर करीत आहे.
मारामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर रणांगणात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आपआपल्या पध्द्तीने आपल्या जनतेसाठी काम करीत आहे. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कारंजा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, तहसीलदार धीरज मांजरे, ठाणेदार सतीश पाटील, ग्रामीण पो स्टे चे ठाणेदार इंगळे, धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी कालिदास तापी, कारंजा नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ तपासे, डॉ नांदे यांचे सर्व सैनिक या लढाईत उतरून नागरिका बाहेर न निघण्याचे आव्हाहन करून शहरात गर्दी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी सोशल डिटीन्स चा वापर 100 टक्के होण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे.
*कारंजा येथे गॅस बुकिंग करिता सोशल डिटन्स चा वापर* *ठाणेदार सतीश पाटील यांच्या मागर्दशनाखाली चोख बंदोबस्त