काजळेश्वर येथे महामानव भारतरत्न
डॉ . बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .
प्रतिनीधी — काजळेश्वर उपाध्ये ( कारंजा हुंकार ) : सद्या देशात राज्यात कोरोनाचे महाभयंकर महामारीचे संकट लक्षात घेता संपूर्ण देश लॉक डाऊन असतांना घटणाकार डॉ .आंबेडकरांनी घटणेत दिलेल्या कलम१४४द्वारा संचारबंदी सर्वत्र जारी आहे त्यामुळे शासन निर्देशाने महामानवाची जयंती घरोघरी आनंदाने साजरी करावी असे निर्देशीत असल्याने काजळेश्वर येथे भीम जयंती घरीच डॉ . भीमराव आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पन करून काजळेश्वरात अनेकांनी घरातच केले .
प्राप्त माहीती नुसार महिला पुरुषांनी पांढरे वस्त्र परीधान करून प्रतिमेसमोर दिवे लाऊन पंचशील म्हटले . प्रतिमेचे मनोभावे पुजन करून पुष्पहार अर्पन करुन आनंदोत्सव घरातच साजरा केला .
बौद्धविहारात एका उपासकाने जाऊनमुर्तीचे पूजन व हारार्पन केले .
अयुर्वेदीक दवाखाना
काजळेश्वर येथील जी.प. आयुर्वेदीक
दवाखाना आरोग्य वर्धीनी उपकेंद्रातही डॉ .भीमराव आंबेडकर यांचा जयंतीदिन घटणाकार भारतरत्न महामानवाचे प्रतीमचे पुजन व हारार्पन करून आरोग्य कर्मचारी वृंदानी सन्मानाने साजरा केला .डॉ . वाघमारे ;संदीप खुळे ;कैलास उपाध्ये ;मंजू जाधव :योगिता वानखडे इत्यादीनी प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभी वादन केले .पेशन्ट तपासून त्यांना औषधोपचार आरोग्य विभागाने सुटीच्या दिवशीही केला . इतर ठिकाणी ग्रामपंचायत बँक इत्यादी ठिकाणीही डॉ .आंबेडकर यांना अभिवादन करून भीम जयंती सोशल डिस्टन्सींग ठेऊन आतल्या आत साजरी झाली
काजळेश्वर येथे महामानव भारतरत्न डॉ . बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .