लॉकडॉऊन चा नियम तोडल्या प्रकरणी आर. टी. ओ विरुध्द गुन्हा दाखल,
धनज पोलीसांची कारवाई
आर टी.ओ वर जिल्हात पहिला गुन्हा दाखल
कामरगांव —( कारंजा हुंकार ) मुन्ना उटवाल
कावीड १९ या संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत असल्याने शासनाने लॉकडॉऊन केले आहे लोकांनी घरी राहुन आपला बचाव करण्याचे आवाहन केले. परंतु काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशाच प्रकार धनज पोलीस स्टेशन अंतर्गत ढंगारखेडा येथील नाकाबंदी वर घडली . यवतमाळ येथे कार्यरत असलेले आरटीओ राहुल गजानन जाधव हे सवीपट डिझायर या गाडीने भरधाव वेगाने कार्यरत कर्मचारी यांना न जुमानता आपल्या धोत्रा गावी निघुन गेले परत येताना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. शासनाचे अधिकारी असुन जिल्हा अधिकारी याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राहुल जाधव यांच्या विरुद्ध भादवी कलम १८८,२७१,२७९नुसार व साथ रोग प्रतिबंधक कायदा ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेश सोनोने, आकाश खंडारे, शरद सोळंके, प्रवीण जटाले करित आहे. सर्वासाठी कायदा समान असुन पोलीसांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.