पत्रकार संजय कडोळे यांच्या प्रयत्नांना यश....
कारंजा (लाड).. कोरोना आजारामुळे त्रस्त झालेल्या वयोवृद्ध जेष्ठ कलाकार, साहित्यीक, लोककलावंताना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सातत्याने धडपडत असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या परिश्रमाला अखेर यश मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार महिन्यापासून वृध्द साहित्यीक कलावंतांना मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांचेवर कोरणा लॉक डाऊन चे परिस्थितीत अक्षरशहा उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत होते. ही भयावह गंभीर परिस्थिती पाहून पत्रकार व विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा चे अध्यक्ष संजय कडोळे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर माहे डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 असे तीन महिन्याचे मानधन शासनाने वयोवृद्ध कलावंतांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन वळते केले त्यामुळे वयोवृद्ध साहित्यिक कलावंतांना दिलासा मिळाला आहे, त्याबद्दल कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण असून शासनाचे आभार मानण्यात येत आहे. शासनाने योग्य वेळी सहकार्य केल्याबद्दल शासनाचे आभार.