वाशिम - अमरावती जिल्ह्यालगत येणाऱ्या सर्व सीमा बंद
धनज बु प्रतिनीधी ( कारंजा हुंकार )
धनज बु हे गाव वाशिम जिल्ह्यच्या सीमेजवळील सर्वात शेवटचे गाव आहे..धनज येथून एक किमी अंतरावर अमरावती जिल्ह्यची सीमा सुरु होते...त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश नुसार सर्व जिल्ह्यच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे..धनज ला लागून अमरावती जिल्ह्यातील चार गावांच्या सीमा लागल्या आहेत..धनज खुर्द, साखरा रोड, काजना रोड, धोत्रा देशमुख या चार हि गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे.त्यामुळे आता अवैध रित्या होणारी वाहनांची येजा पूर्ण पणे बंद झाली आहे...यातील धनज खुर्द येथे धनज बु।। पो स्टे च चेकपोस्ट आहे...मात्र उर्वरित तीन ठिकाणी मुरूम व काट्या टाकून या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे...कोरोना ला आळा घालता यावा या साठी पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग ,यांचा कडून सर्वतोपरी प्रयतन होत आहे...