दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, दूध संकलन केंद्र सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल
वाशिम, दि. २१ (जिमाका) ( कारंजा हुंकार ) : जिल्ह्यात दूध संकलन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केंद्र सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २१ एप्रिल रोजी दिले आहेत.
आस्थापना, दुकाने व सेवा सुरू करण्याबाबत १९ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात दूध संकलाचा कालावधी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत नमूद करण्यात आला होता. या आदेशात बदल करून दूध संकलन, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केंद्र यांचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.