वाशीम जिल्हातील संत्रा कोल्ड हाऊस मध्ये पडून
कोरोणामुळे संत्रा बागायतदार संकटात
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
वाशीम जिल्हातील काहि भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे उत्पादन घेत असून मुंगळा येथील शेतकरी चांगला भाव मिळावा म्हणून संत्रा कोल्ड हाऊस मध्ये ठेवतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संत्रा मुंगळा येथील संत्रा बागायतदारांनी संत्रा हैदराबाद येथील वेअर हाऊस मध्ये ठेवलेले आहे. मात्र जेव्हापासून कोरोना विषाणूंमुळे सर्वत्र लोकडाऊन असल्यामुळे येथील संत्रा बागायतदारांचा संत्रा हा तेथील वेअर हाऊस मध्ये पडुन असल्यामुळे सध्या विक्रीसाठी जाता येत नाही त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात आला आहे मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जाते मात्र सुरुवातीला चांगला भाव मिळत नसल्यामुळे येथील बागायतदार राज्याबाहेर हैदराबाद या ठिकाणी आपला संत्रा साठवणूक करून ठेवतात व नंतर भाव आल्यावर तो विक्रीला काढतात मात्र सध्याच्या स्थितीत तो विक्री करणे शक्य नसल्यामुळे तेथील संत्रा खराब होणार नाही या भीतीने येथील संत्रा बागायतदार चिंतेत आहे. तरी या संत्रा बागायतदारांना त्यांचा माल विकण्याकरिता त्यांना तेथे जाऊन आपला माल विकण्याची परवानगी देण्याची मागणी येथील बागायतदार महादेव राऊत, लक्ष्मण राऊत अशोक केळे गजानन केळे यासह अनेक शेतकऱ्यांची ची मागणी आहे.