मानव एकता बहूउद्देशिय सामाजिक संस्था, हरीओम भजनी मंडळ बायपास तसेच के एन कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना पथक यांचेतर्फे गरिब गरजूंना किराणा किटचे वाटप
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार )
कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या भयावह संकटातून रक्षणासाठी शासनाने लागु केलेल्या लॉकडाऊन मधील संचारबंदीचा सर्वात मोठा परिणाम जर झाला असेल तर तो म्हणजे हातावर पोट भरत असलेल्या गरिब गरजुंवर,गरीब दिव्यांगांवर तसेच निराधार विधवा महिला आणि व्रुद्धांवर.मागील २१ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन मधे असल्यामुळे हातावर पोट भरत असलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे त्याचबरोबर दिव्यांग,विधवा महिला आणि निराधारांचे हाल होवू नये म्हणून स्थानिक बायपास स्थित हरीओम भजनी मंडळ, मानव एकता बहूउद्देशिय संस्था तसेच के.एन.कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने तसेच मानव एकता बहूउद्देशिय संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारंजा शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील गरजूंना १२१ किराणा किटचे वाटप आजपासून सुरू करण्यात आले .यामध्ये मानवतेच्या ह्या कार्यात आमचाही खारीचा वाटा असायला हवा असे संबंधित महीला भगिनींनी ह्यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
ह्याप्रसंगी हरीओम भजनी मंडळ, मानव एकता बहूउद्देशिय संस्था तथा के।एन.कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी उपस्थित होते.