काजळेश्वर येथे अकोला जिल्हयातून होणारे वाहतुक बंद करण्याकरीता कारंजा
ग्रामीण पोलीसांची चौकी कार्यान्वीत .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : सध्ध्या वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त आहे . शेजारीलअकोला ;यवतमाळ ;अमरावती जिल्हयात कोरोणा संक्रमित केसेस वाढत आहे . तेव्हा शेजारील अकोला जिल्हयातून छूप्या पद्धतीने होणारे आवागमन थांबावे करीता जिल्हा प्रशासनानाचे आदेशान्वये कारंजा तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार धीरज मांजरे आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर इंगळे यांचे समन्वयातून कारंजा ग्रामीण पोलीसांनी दि .२८ एप्रील पासून काजळेश्वर येथे एसटी शेड जवळ पोलीस चौकी सुरु झाली आहे . प्राप्त माहीतीनुसार कारंजा तालूका अकोला ;अमरावती ;यवतमाळ जिल्हयाच्या सिमेलगत आहे . या जिल्यातून आवागमन होऊ नये की ज्यामुळे कोराणा विषाणू संक्रमीत वाहक आड रस्त्याने येऊ नये करीता अकोलाजील्ह्यातून धानोरा पाटेकर मार्गे किवा विराहीत काजळेश्वर पांदन रस्त्या वाटे कारंजा तालूक्यात प्रवेश करू नये करीता काजळेश्वर उपाध्ये येथे धानोरा रस्ता छूपा प्रवेशबंद करण्या हेतू कारंजा ग्रामीण पोलीस चौकी सुरू झाली आहे . पोलीस नाकाबंदी चेक पोष्ट पथकात दोन शिक्षक अनंत धोटे . हुसेन 'गुलाम मोहम्मद ;तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद उपाध्ये पोलिसांना सहकार्य करणारे सुभाष उपाध्ये : गजानन उपाध्ये महादेव जाधव . 'अलीम भाई ;तसेच कोतवाल सचिन भगत : पोलीस कान्स्टेबल पवन तायडे दक्षता समीतीचे प्रदीप उपाध्ये सचिन हाते इत्यादी चौकीवर खडा पहारा देण्याकरीता उपस्थीत असतात .
काजळेश्वर येथे अकोला जिल्हयातून होणारे वाहतुक बंद करण्याकरीता कारंजा ग्रामीण पोलीसांची चौकी कार्यान्वीत