काजळेश्वरातील विधवा महिलांना लॉक डाऊन काळात तीन महीन्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने
आर्थीक मदत करावी
सामाजीक संघटनेचे विनोद उपाध्ये
यांनी केली मागणी
काजळेश्वर उपाध्ये प्रतीनीधी — नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : कोरोणा महामारी वाढू नये ;ह्या विषाणूचा संसर्ग होऊ नये करीता जील्हा प्रशासनाने कायदाची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे . इतर जिल्ह्यात वाढणारा संसर्ग लक्षात घेता वाशिम जिल्हा सध्या सुरक्षीत आहे मात्र गाफील राहून
चालणार नाही करीता पोलीस प्रशासन लॉक डाऊनमधे रहा . बाहेर फिरु नका . घरातच रहा . तुमची व्यवस्था शासन करेल अशी विनंती
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केली आहे .
त्या अनुशंगाने येथीलराजे गृप ह्या सामाजीक संघटनेचेप्रमुख विनोद पाटील उपाध्ये म्हणाले
की गावात१५० विधवा महीला आहेत त्यांना आर्थीक मदतीची गरज आहे ज्याप्रमाने शासन दिव्यांगाना चौदाऱ्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायत मार्फत मदत करते त्याचप्रमाणे येथील विधवा निराधार
महीलांना लॉक डाऊन काळात तीन महिन्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून आर्थीक मदत करावी . त्यामुळे त्यांना संचारबंदीच्या काळात थोडी आर्थिक
सहाय्यता मिळेल या मागणीचा ग्रामपंचायत प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करावा व
विधवा निराधार महिलांना आर्थिक आधार द्यावा अशी मागणी विनोद पा . उपाध्ये यांनी केली आहे .