अवैधरित्या दारू काढून विकणाऱ्यांवर धनज पोलिसांची कारवाई
धनज प्रतिनीधी अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
धनज येथून 7 किमी अंतरावर असलेल्या ग्राम धोत्रा देशमुख येथे अवैध रित्या दारू काढणाऱ्यांवर धनज पोलिसांनी दि 28 एप्रिल ला कारवाई केली..सदर माहिती अशी आहे की , धोत्रा देशमुख येथील मुकुंद वरघट, आणि सुभाष वैद्य हे दोघे शेत शिवारात अवैधरित्या दारू काढत असल्याचे धनज पोलिसांच्या लक्षात येताच सदर ठिकाणाहून 25 लिटर दारू हस्तगत करण्यात आली .याची किंमत 2500 रु एवढी असून त्या दारू ची विल्हेवाट लावून त्या आरोपीना ताब्यात घेण्यात आले व त्यांचावर अपराध नं.166 ने कलम 188, 269 व साथरोग अधिनियम कलम 3 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात भारत रामटेके, शिवाजी ठवकर , प्रदीप डाखोरे, सुनील वाणी, करत आहे.