बैंकर्स कर्मचाऱ्यांना कोरोना च्या काळात विम्याचे संरक्षण द्या —
अंकुश घाटे यांची मागणी
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )दि. 19 नुकतीच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र सरकार द्वारा जाहीर झाली. त्यात कोरोना विषाणु चा निपटारा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाचे विम्याचे संरक्षण देण्यात यावी अशी मागणी
ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया SC/ST/OBC असोसिएशन विदर्भ युनिट चे अंकुश घाटे यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दि.18 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले की पोलीस,डॉक्टर, नर्स,सफाई कर्मचारी येतात. त्याच धर्तीवर "दिल्ली" केंद्रशासित सरकारने सुध्दा डॉक्टर,नर्स, सफाई कर्मचारी यांना कोरोना विषाणु संक्रमणाच्या काळात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास रुपये 1 करोड रक्कमेच्या विम्याचे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सुध्दा कोरोना मुळे पोलीसांचा मृत्यू झाल्यास रुपये 50 लाख मृतकाच्या कुटुंबीयास देण्याची घोषणा नुकतीच जाहीर केली आहे.तसेच अंगणवाडी सेविकाव
मदतनीस,आशा सेविका
,ग्रामपंचायत कर्मचारी
,ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी यांना कोरोना काळात सेवा केंद्र चालविणारे केंद्रचालक
यांच्या साठी रु.25 लाखांच्या विम्याची घोषणा जाहीर केली आहे. त्या प्रमाने बैंकर्स कर्मचारी पण कोरोना विषाणु संक्रमणाच्या काळात देशाची आर्थिक बाजु अगदी जीव मुठीत घेवुन भक्कमपणे सांभाळत आहोत. म्हणून आमचा ही ह्या कठीण प्रसंगी विचार व्हावा. आमचाही जीव आहे, अन आमचे ही कुटुंब आहे म्हणून "दिल्ली" केंद्रशासित सरकारने घेतलेल्या निर्णया प्रमाणे महाराष्ट्र सरकार ने सुध्दा ह्याच धर्तीवर योजना लागु करुन त्यात बैंकर्स चा समावेश करावा अशी मागणी ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया SC/ST/OBC असोसिएशन विदर्भ युनिट विशाल घाटे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कारंजा हुंकार