जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी करीता कारंजा नगर पालिकेचे ऑनलाईन अॅप
कारंजा ई- मार्केट अॅपद्वारे नागरिकांनी खरेदी केलेल्या वस्तूची घरपोच सुविधा
प्रतिनिधी । कारंजा (लाड) कारंजा हुंकार
संपुर्ण महाराष्ट्रात करोना बाधित रुग्ण अधिक वाढत असल्यामुळे नागरिकांकरिता जीवनावश्यक वास्तूच्या खरेदीकरीता पालिकेमार्फत ऑनलाईन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपद्वारे नागरिकांनी खरेदी केलेल्या वस्तूची घरपोच सुविधा करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली आहे.
शहरात व जिल्हयात एक ही करोना बाधित रुग्ण नाही. तसेच खबरदारी म्हणून तसेच कोरोना या विषाणूचा प्रसार तसेच प्रादुर्भाव पसरू नये. या करिता शहरातील नागरिकांना घरा बाहेर न निघण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी करीता ‘कारंजा ई-मार्केट‘ या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हा अॅप गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध करण्यात आला असून यात किराणा वस्तूसह, दूध आणि औषधांची घरपोच सुविधा करून देण्यात येणार आहे. या अँप ची माहिती देण्याकरिता शहरातील व्यावसायिकांची नगर परिषद कार्यालयात एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व व्यावसायिकांना या बाबत सविस्तर मार्गदर्शन करून 'सोशल डिस्टनसिंग' चे पालन करणे तसेच खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आली. या वेळी नगर पालिकेचे मुख्यधिकारी डॉ.अजय कुरवाडे, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कारंजा ई-मार्केट‘ चा वापर करून कोरोना शी लढा द्या- डॉ.कुरवाडे
सध्या संपूर्ण देशामध्ये 'लॉक डाऊन' जाहीर करण्यात आले आहे.अशातच प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहे की घरातच राहा कोरोनाला हद्द पार करा.याच पार्श्वभूमीवर नगर पालिकेच्या वतीने 'कारंजा ई- मार्केट' या अँपची निर्माती करण्यात आली आहे. नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी या अँप चा वापर करून जिल्ह्यासह शहराला कोरोना मुक्त शहर बनविण्यास मदत करावी.
डॉ.अजय कुरवाडे
मुख्यधिकारी,न.प.कारंजा