कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लाडेगाव येथील युवकांचा पुढाकार
कारंजा :- संपूर्ण जग कोरोना विषाणू च्या माहामारीने त्रस्त असून कोरोना चा प्रादुर्भाव थांबवन्यासाठी संपूर्ण विश्वात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहे. भारतात सुद्धा शासनाने राष्ट्रीय स्तर ते ग्रामस्तरापर्यंत विविध उपाययोजना अमलातआणून कोरोना संसर्ग थांबावण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असता लाडेगाव येथील युवकांनी ग्राम स्तरावर ग्रामपंचायतच्या अधीन राहून "कोरोना प्रतिबंधक समिती'' गठीत केली आहे. या समितीमधील सदस्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउन मधील नियमाचे पालन करण्यास ग्रामवाशी यांना प्रोत्साहित करत आहेत. युवकांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रशासनावर येणारा ताण काही प्रमाणात कमी केल्याचे दिसून येते. लाडेगाव वाशी सुद्धा समिती ला प्रचंड प्रतिसाद देत असून गावात खऱ्या अर्थाने लॉकडाउन यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे तर या समितीमध्ये उपस्थित युवक म्हणून सचिन सवाई,रुपेश सुरुजुसे,रवींद्र सुरुजुसे,नितीन सवाई,सचिन सिदगुर,आशिष धोंगडे,आकाश सवाई,सुधीर गवई, मंगेश ढवक,आकाश काळे, शेहजाद पठाण,सतीश इंगळे, संतोष लवटे तसेच सरपंच मा.सौ.ममता सातंगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोबतच पोलीस पाटील मा. श्री. नितीन घोडसाळ तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. शरद अवघड या नागरिकांचा समितीमध्ये सहभाग नोंदविला ......