आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा. राहुल रविराव संविधान प्रचारक
घरावर निळे झेन्डे लावुन साजरी करा जयंती
कारंजा ( कारंजा हुंकार ) :- सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशाने विविध उपाययोजना केल्या आहेत.त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे आपला संपूर्ण भारत देश हा लॉकडाऊन केला आहे.यामुळे ह्या कोरोना विषाणू संसर्गजन्य जी साखळी आहे ती तुटण्याला मदत होते. म्हणून केंद्रसरकार,राज्यसरकार ने सर्व सामाजिक,धार्मिक सण,उत्सव,यात्रा,मेळावे इत्यादी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून सोशल डिस्टस्टिंग करण्याचे ठरविले आहे.म्हणून जेव्हा,जेव्हा या देशावर संकट आली आहेत तेंव्हा तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संकटसमयी मदत करून या देशाला प्रथम प्राधान्य देत मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत:भारतीय आहे.एवढे या देशाबद्दल प्रेम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होते. आणि त्यांचीच जयंती यावर्षी 14 एप्रिल या संकट परिस्थितीत आज आहे.म्हणून आज रोजी जे देशावर मोठे संकट आहे प्रथमतःआपण आपल्या देशावर आलेले संकट घालवूया,मग भिमजयंती मोठया उत्साहात साजरी करूया,असे भावनिक आवाहन राहुल भाऊ रविराव संविधान प्रचारक यांनी प्रसिद्धीपत्रकातून तमाम जनतेला आवाहण केले आहे.पुढे संविधान प्रचारक राहुलभाउ रविराव म्हणाले की,यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्या घरातच पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर नतमस्तक होऊन,त्रिशरण, पंचशील ग्रहण करावे,पुष्पहार घालून, मेणबत्ती लावून,अतिशय संवेदनशील वातावरणात जयंती साजरी करण्यांचे आवाहन संविधान प्रचारक राहुलभाऊ रविराव यांनी केले आहे