देशाला अभिमान वाटावा असं काही घडतं तेव्हा
ईराणने युद्धासाठी राखून ठेवलेला विशेष मार्ग केला भारतासाठी मोकळा
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार )
भारतात अडकलेले युरोपियन, कॅनेडियन नागरिक आणि काही मदतसाहित्य व युरोपियन देशासाठी औषधी साहित्य घेऊन एअर इंडियाची दोन विमानं काल उडाली तेव्हा पुढे काय होणार आहे, याची वैमानिकांना जराही कल्पना नव्हती. ! स्वच्छ खुला असमान ,ठिक ठिकाणी जिगरबाज भारतीय वैमानिक व स्टाफ चं होणार कौतूकास्पद स्वागत!
भारताची हद्द ओलांडून ही विमानं जेव्हा पाकिस्तानी हद्दीत शिरली तेव्हा कराचीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमने अस्सलाम वालेकुम म्हणत त्यांचं स्वागत केलं, आणि इतकंच नाही तर "या कठीण परिस्थितीतही एअर इंडिया मदत साहित्य घेऊन करत असलेल्या या फेऱ्यांबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो" अशा शब्दात भारतीय वैमानिकांचं त्यांनी कौतुकही केलं, त्यांचं धैर्य वाढवलं! जन्मजात शत्रू असलेल्या देशाकडून असे शब्द ऐकायला मिळाल्यावर वैमानिकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला नसता तरच नवल....
त्यानंतर इराणने तर या महा विरांच स्वागत करत त्यांच्या सरकारने त्यांच्या हद्दीतून थेट युरोपात जायला स्वतःचा केवळ आणि केवळ युद्धासाठी राखून ठेवलेला विशेष १००० किलोमीटर्सचा मार्ग या विमानांसाठी मोकळा करून दिला, आजवरच्या उड्डाणकारकिर्दित मिळालेलं हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं त्या वैमानिकांसाठी!
मुंबई, कराची, तुर्कस्थान, आणि नंतर फ्रँकफर्ट,ब्राझील या सगळ्या कंट्रोल रूम्सकडून शाबासकीची पावती घेत ही दोन विमानं मुक्कामी पोचली. ब्राझील मध्ये या वीरांची गल्लीत चर्चा होती.ब्राझीलच्या राष्ट्रपतीने या वीरांच कौतुक करत भारत व भारतीयांचे राष्ट्रीय चॅनल वर आभार मांडले!
कोविड-१९ चा धोका असल्याने विमानांमधल्या संपूर्ण क्रू आणि वैमानिकांनी तब्ब्ल वीस तास कव्हरऑल परिधान केले होते! ही सर्व मंडळी कर्तव्य बजावून आता १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत.
साऱ्या जगाकडून प्रशंसा मिळवणाऱ्या माझ्या देशासाठी हा आनंद दिवाळीपेक्षा अजिबातच कमी नाही. !