मास्क न वापरणा-या १४ व्यक्ती विरूध्द ग्रामीण पोलिसांची कारवाई
२८०० रुपयांचा दंड वसुल
उंबडाॅबाजार प्रतिनीधी कारंजा हुंकार
कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात येणा-या गावामधील १४ नागरिकां विरोधात मास्क चा वापर केला नसल्या बद्दल प्रतिबंधक कारवाई करून दि.१७ एप्रिल रोजी २८०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.
सविस्तर असे की कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या वतीने ग्रामीण भागात लाॅकडाउन दरम्यान च्या संचारबंदी ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मोबाईल स्काॅड पथक प्रमुख पी.एस. आय. देवीदास वाघमोळे आपल्या सहका-या समवेत ग्रामीण भागातील संचारबंदी कडक अंमलबजावणी साठी ग्रामीण भागात जोर दिला असल्याने ग्रामीण भागात सुध्दा मोठा प्रतिसाद दिसुन येत आहे .
संचारबंदी दरम्यान ग्रामीण भागात आढळून येणा-या दुचाकी , चारचाकी वाहनाची सुध्दा कसून तपासणी करण्यात येत आहे .माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांचे आदेशानुसार तोंडाला मास्क न वापरणा-या नागरिकां विरोधात कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळेयांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे .
या अनुषंगाने कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे मोबाईल स्काॅड पथक प्रमुख पी.एस .आय. देवीदास वाघमोळे यांनी ग्रामीण भागातील १४ नागरिकां विरोधात तोंडाला मास्क वापर केला नसल्यामुळे जिल्हा अधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन झाल्याबद्दल प्रतिबंध कारवाई करून २८०० रूपयांचा दंड वसुल केला . यावेळी कारवाई दरम्यान पो.काॅ. संतोष राठोड , पो.काॅ. पवण तायडे यांनी मोलाची भुमिका बजावली .
मास्क चा वापर न करणा-या नागरिकां विरोधात कारंजा ग्रामीण पोलिसांच्या वतीने धडक कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र मास्क चा वापर न करणा-या नागरिकांच्या मनात कारवाई ची भिती निर्माण झाली आहे.
मास्क न वापरणा-या १४ व्यक्ती विरूध्द ग्रामीण पोलिसांची कारवाई २८०० रुपयांचा दंड वसुल