सविधान प्रचारक अंतर्गत लाडेगांव येथे विधवा महिला ,अपंगाना व गरीब कुटुंबियाना एक महिना पुरेल एवढा किराणाचे वाटप
कारंजा लाड दि २७ ( कारंजा हुंकार )
संविधान प्रचारक लोकचळवळ अंतर्गत कोरोना विषाणूजन्य आजारात लोक डाऊन मुळे मुजरावर आधारावर, अपंग, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या काळात संस्थेच्या वतीने लाडेगांव ता. कारंजा लाड जि. वाशिम या भागातील गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराना किटचे वाटप करण्यात आले याअंतर्गत लाडेगाव येथील 20 गरजू कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले आहे यानंतर सरकारी सूचनेचे पालन करू फिजिकल डिस्टन्स ठेवून तसेच सर्वांनी तोंडाला मास लावून शांततेत नियमाचा भंग न होता वाटप करण्यात आले
या वाटपा करिता मा. श्री. आशिष धोंगडे (ASK वाशिम जिल्हा समन्वयक व संविधान प्रचारक) पत्रकार मा.श्री. सय्यद अबरार सामाजिक कार्यकर्ते आकाश सवाई तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
या वाटप करिता मा. तहसीलदार साहेब धीरज मांजरे व धनज पोलीस ठाणेदार मा. श्री. जाधव साहेब आणि मा. श्री. वाणी जमादार त्यांचे मोठ्या प्रमाणात मदत केले व तसेच प्रशासनाने व युवा अनुभव शिक्षा केंद्र यांनी सहकार्य केले..........