कारंजा नगरपालिके कडून मान्सूनपूर्व नाले सफाई
भूमिगत नाल्यांची १७ वर्षा नंतर सफाई ; अतिक्रमण धारकांचा होता अडथडा
'ती' तक्रार बिनबुडाची तसेच चुकीची - मुख्यधिकारी डॉ.अजय कुरवाडे
कारंजा लाड प्रतिनीधी दिलीप रोकळे ( कारंजा हुंकार )
; शहरातील मोठे व लहान नाले व भूमिगत नाल्याचे चेंबर युद्धस्तरावर सफाई करण्याच्या मुख्यधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे नाल्यांवर ज्यांचे अतिक्रमण आहे अश्यांची पाहणी करून तातडीने अतिक्रमण काढण्यात येत आहे.तसेच तुटफुट झालेल्या ठिकाणी नाले त्वरित दुरुस्ती करणे, ज्या ठिकाणी नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो तिथे जागा खोलगट करून पाण्याचा मार्ग मोकळा करणे, मोठ्या नाल्यावर जेसीबी मासिनने नाले सफाई आणि नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.
शहरात एप्रिल महिन्यातच मान्सूनपूर्व मोठे व लहान नाले सफाई करण्याच्या दृष्टीने मुख्यधिकारी यांनी 'लॉक डाऊन' आल्यामुळे तसेच शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टनसिंगची अमलबजावणी करून आढावा बैठक घेतली.या बैठकीला, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, शहर अभियंता सुधाकर देशमुख,स्वच्छता निरीक्षक विनय वानखडे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्याअनुषंगाने शहरातील मोठे व लहान नाले मनुष्य बळाद्वारे सफाई करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.तसेच भूमिगत चेंबराची सफाई करण्यात येत आहे.नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलून कंपोस्ट डेपो येथे टाकण्यास सोयीचे व्हावे, याकरिता जेसीबी व ट्रैक्टर लावून जागा समतोल करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. न.प.मुख्यधिकारी डॉ.कुरवाडे व शहर अभियंता देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला आहे.मात्र स्थानिक काही नागरिकांनी दि.१५ एप्रिल रोजी या कामाबाबत तहसीलदार कारंजा यांना तक्रार दिली आहे.त्यांनी मुख्यधिकारी यांच्यावर आरोप केले आहे की, कोणतीही पूर्व सूचना तसेच नोटीस न देता त्यांनी अतिक्रमण काढले आहे.
*व्यवसायिकांनी दिलेली 'ती' तक्रार चुकीची*
स्थानिक जयस्तंभ चौकातील भूमिगत गटार व फुटपाथ पायी चालणाऱ्या नागरिकांच्या सोईकरिता वर्ष २००३ मध्ये बांधण्यात आले होते व त्यामध्ये कठडे ही नगर पालिकेने लावले होते.मात्र या कठड्याचा फायदा नागरिकांऐवजी दुकानदार घेत होते. तसेच त्या कठड्यावर त्यांनी शेड उभारले होते. व पायी चालणाऱ्या लोकांची गैरसोय होत होती. दुकानदारांनी बनविलेल्या शेड मुळे गटार साफ करण्याकरिता अडथळा निर्माण होत असे. त्या परिसरातील काही नागरिकांनी या कामाबाबत तक्रार दिली.मात्र ह्या तक्रारी मध्ये कोठेही तथ्य नसून ही तक्रार बिनबुडाची व चुकीची आहे. गेल्या १७ वर्षांपासून काही लोक या ठिकाणी कामात अडथडे निर्माण करीत असल्यामुळे हे सफाई काम प्रलंबित होते. सध्या 'लॉक डाऊन' सुरू असल्यामुळे तसेच सर्व दुकाने बंद असल्यामुळे काम करणे सोयीचे आहे याचा फायदा घेत कारंजा नगर पालिकेमार्फत सफाई काम नगर पालिका आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये राहून करीत आहे. तसेच अतिक्रम मोहिमेदरम्यान मुख्य रस्त्यावर असलेला अतिक्रमण हटवितांना कोणाचीही गय केली जाणार नाही.
*डॉ.अजय कुरवाडे*
मुख्यधिकारी न.प.कारंजा