काजळेश्वरचा नियमीत विद्युत पुरवठ्या अभावी होणारा अनीयमित पाणीपुरवठा प्रश्न निकाली .
गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नी गावातील
सर्वपक्षीय नेत्याचे प्रयत्न फळाला .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार ) : अैन उन्हाळ्यात पाणी असूनही विद्युतच्या अनीयमिततेमुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वैताग होता हे लक्षात घेता गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रीत पाणीप्रश्न सोडविण्यास प्रयत्न केलेत सर्वाच्या सहयोगातून हा प्रश्न सुटला असून
नळ योजनेसाठी स्पेशल ट्रान्सफार्मर महावितरणाने दिला असून दि .२२ एप्रीलपासून कामाला सुरवात झाली आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर येथील ग्रामस्थांना नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीवरील विद्यूत मोटार
जोडणी कृषी फीडरवरून होती . कृषी फीडरवरून लोड शेडींग नुसार आठ तास विद्युत मिळत होती त्यात जलकुंभ भरण्यासच सहा तास लागायचे त्यामुळे ग्रामस्थांना पांचव्या
सहाव्या दिवशी पाणी मिळायचे ही समस्या लक्षात घेता गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी सामूहीक प्रयत्न आपआपस्या पद्धतीने गावचा पाणीप्रश्न सुटावा करीता केलेत आणि महावितरणाने गावचा पाणीप्रश्न निकाली काढण्याकरीता काजळेश्वरच्या नळयोजनेकरीता स्वतंत्र ट्रान्सफारमर मंजूर केले . ग्रा.पं. सदस्य नितीन पाटील उपाध्ये यांनी भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉ . राजीव काळे यांचे मार्फत ही समस्या आ . राजेंद्र पाटणी यांचे मांडली . गावातील जी.प . माजी सदस्या सौ. ज्योती ताई गणेशपूरे यांनी कारंजा विद्युत कार्यालय वाशिम विद्युत कार्यालयाचे अभियंता विजय
भटारीया यांचेशी सतत पाठपुरवठा करुन उर्जा मंत्र्याशी संवाद केल्याचे
सौ . ज्योतीताई गणेशपूरे म्हणाल्यात
तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सदर प्रश्न
माजी आमदार प्रकाशदादादा डहाके यांचे कडे नेला . सर्वांच्या सामूहीक प्रयत्नाचे फलीत गावच्या नळ योजनेकरीता स्वतंत्र ट्रान्स्फारमर मिळाला आहे .ट्रान्स्फारमर बसविण्यासाठी लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे .
महावितरणाकडे काजळेश्वर पाणीप्रश्न निकाली काढण्याकरीता ठोस कार्यवाही व्हावी करीता माजी जी.प. सदस्या सौ. ज्योतीताई I गणेशपूरे भ्रमणध्वनीवरून सतत पाठपुरवठा करीत होत्या .सर्वाच्या मागणीस प्राधान्य देण्यात आले .
विजय भटारीया .
वरीष्ठ अभियंता महावितरण .
गावकऱ्यांची मागणी ग्रा.प. सदस्य नितीन पा . उपाध्ये यांनी सांगीतली ती लक्षात घेता आ . राजेंद्र पाटणी यांनी त्वरीत ट्रान्स्फारमर मंजूर केला .
डॉ राजीव काळे
भाजपा कारंजा तालूका अध्यक्ष .