संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी नवरी - नवरदेवसह वऱ्हाडावर गुन्हा दाखल..
धनज बु प्रतिनीधी — अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
धनज बु...धनज पो .स्टे. अंतर्गत येत असलेल्या ग्राम कूपटी येथे दिनांक 21 एप्रिल ला विवाह संपन्न झाला. परंतु संचारबंदी उल्लंघनकेल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...
सदर माहिती अशी आहे की, कुपटी येथील रहिवासी प्रल्हाद मोकोडे यांची मुलगी वैशाली मोकोडे (19) हीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील रहिवासी महादेवरवजी कंटाळे यांचा मुलगा मोहन कंटाळे (24) याच्या शी झाला. परवानगी शिवाय तसेच पाच पेक्षा अधिक लोक या लग्नात असल्याचे लक्षात येताच येथील पोलीस पाटील श्रीमती स्वाती निंघोट यांनी याविषयी ची माहिती धनज पो स्टे अंतर्गत येत असलेल्या कामरगाव चौकीला दिली..या विषयी धनज पोलिसांनी लगेच दखल घेतली....कोरोना व्हायरस मुळे संचारबंदी तसेच जिल्हाबंदी असून त्याचे उल्लंघन केल्यामुळे..या लग्नातील नवरी नवरदेव सोबत महादेवराव कंटाळे, शामरावजी कऱ्हाळे , प्रल्हाद मोकोडे,सौ. लता मोकोडे, सौ.माधुरी लसनकार हे सुद्धा होते..त्यामुळे या सर्वांवर कलम 188, 269 व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलमी 3 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हसके, रवींद्र राजगुरे , गजानन कदम ,शामल ठाकूर, दीपक खंडारे सुनील टाले