सुरक्षेच्या दृष्टीने चेक पोस्ट मध्ये वाढ
धनज बु प्रतिनीधी अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
जिल्हाबंदी असून सुद्धा काही वाहने जिल्हाबंदी तसेच संचारबंदी च्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनात येताच धनज पो स्टे अंतर्गत अतिरिक्त चेक पोस्ट वाढविण्यात आली आहे..धनज ते अमरावती मार्ग हा बंद केला असून सुद्धा काही वाहन धारक छुप्या मार्गानी येत असल्यामुळे तसेच रात्रीच्या वेळेस अमरावती येथून कारंजा जाण्यासाठी बरेच वाहनधारक धनज ते साखरा या मार्गनी येत असल्याचे लक्षात येताच धनज पोलीस स्टे ने साखरा रोड वर एक अतिरिक्त चेक पोस्ट वाढवली आहे..या चेक पोस्ट पासून अमरावती जिल्ह्याची सीमा ही फक्त एक किमी अंतरावर असल्यामुळे वाहनांची ये जा सुरु च होती..सद्याअमरावती जिल्हा हा कोरोना चा हॉट स्पॉट बनला आहे..त्यामुळे ही वाहनांची ये जा सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याचे लक्षात येताच ही अतिरिक्त चेक पोस्ट वाढवली आहे.
धनज हे गाव अमरावती जिल्ह्यच्या सीमे लगत असल्यामुळे वाहनधारक छुप्या मार्गांचा वापर करून घुसखोरी करत आहे.अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन हा चेक पोस्ट वाढविण्यात आला आहे
सोमनाथ जाधव
पोलीस निरीक्षक, धनज बु।।