अमोल अंभोरे कडून ग्रामीण भागातील गरजूवंताना धान्य व किराणा किट चे वाटप
कारंजा लाड दि. 13 अनिकेत ईन्टप्रायजेस संचालक तथा सामजिक कार्यक्रते अमोल अंभोरे यांच्या कडून ग्रामीण भागातील झोडगा, लोणी, मुगुटपुर, तारखेडा, प्रिपी, सुकळी या सह 50 गावात नागरिकांना धान्य व किराणा किटचे वाटप दि. 22 एप्रिल रोजी करण्यात आले.
तालुक्यातील ग्राम धानोरा ताथोडं येथील रहिवासी असलेले अमोल अंभोरे हे नेहमी सामाजिक कार्यात अगसर राहत असून या कोरोनाच्या लॉक डाउन दरम्यान हातावर कमावणार्या नागरिकांना तसेच परीसरातील गरजू वंताना धाण्य व किराणा किट चे वाटप गावा गावात जाऊन करण्यात आले. हे वाटप गावातील सरपंच विजय ननावरे, जनार्धन घरडे, पंकज वरघट याच्या हस्ते करण्यात आले.
अमोल अंभोरे कडून ग्रामीण भागातील गरजूवंताना धान्य व किराणा किट चे वाटप