कुपनलीका बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय
ग्रा.प.प्रशासनाचे दुर्लक्ष
उंबडाॅबाजार ( वार्ताहर )
येथील वाडॅ क्र. ३ मधील जांब मार्गावरील अंगणवाडी जवळील कुपनलीका गेल्या दहा - बारा दिवसांपासून बंद असुन संचारबंदी लागु असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे .
सविस्तर असे की संपुर्ण गावात १४ ते १५ पाणी सोडण्याचे व्हाॅल्व असुन एकदा एका काॅक ला पाणी आले की दुस-यांदा काॅक ला पाणी येण्यासाठी जवळपास सहा ते सात दिवसांचा कालावधी लागतो .मात्र सहा ते सात दिवसांचा पाणी साठा जमा करण्याची गरीब कुटंबाकडे व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबातील ग्रामस्थांची तहान याच कुपनलीकेवर अवलंबून होती .
परंतु सध्या कोरोणा विषाणु जन्य आजारामुळे लाॅकडाउन सह संचारबंदी असल्याने या भागातील नागरिकांना मस्जिद जवळील हातपंपा चा सहारा घ्यावा लागत आहे .यातच ग्रामविकास अधिका-याच्या गैरहजरीमुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद राहत असल्याने दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न वार्ड क्र. तीन मधील जांब मार्गावरील अंगणवाडी जवळील नागरिकांना पडला आहे.
कुपनलीका बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय ग्रा.प.प्रशासनाचे दुर्लक्ष
• ankush kadu