काजळेश्वर येथील हभप .गोपाल महाराज यांनी नाथ सांप्रदायाची घेतली दिक्षा .
प्रतीनीधी — काजळेश्वर उपाध्ये
मौजा काजळेश्वर उपाध्ये येथील हभप गोपाल महाराज उपाध्ये यांनी गुढीपाडव्याचे महूर्तावर श्रीनाथ योगा श्रम रामगाव रामेश्वर येथे श्रीसिद्ध सत् गुरु शांतीनाथ महाराज यांचे पवित्र हस्ते योगी अलखनाथजी गुरु श्रीशांतीनाथ महाराज असे नामकरण करुण नाथ संप्रदायातील नविन नियमानुसार दिक्षा घेतली .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर येथील हभप .गोपाल महाराज यांनी
श्री क्षेत्र आळंदी येथे सांप्रदायीक : ज्ञानेश्वरी ग्रंथ धर्मशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून अंबेजोगाई जवळील स्वामीजीचे आश्रमात वेद उपनिषदाचे
अध्ययण पूर्ण केले . काजळेश्वर येथील धार्मीक कार्यक्रमात सातत्याने
त्यांचे मार्गदर्शन राहीले . चैत्र शुद्घ प्रतीपदा गुढीपाडवा या पवित्र साडेतीनर्मुहूर्तावर श्रीसिद्धसत् गुरु रामनाथमहाराज यांचे पदस्पर्शाने पावनभूमीत श्रीनाथ योगाश्रम रामगांव रामेश्वर ता.दारव्हा येथे गोपाल महाराज उपाध्ये यांनी श्रीसदगुरु शांतीनाथ महाराज यांचे पवित्र हस्ते योगी अलरवनाथजी गुरु शांतीनाथजी महाराज असे नामकरण करुन नाथ संप्रदायाची दिक्षा घेतली
याप्रसंगी साधू गण ;शिष्य गणाची उपस्थिती होती .