कुंभार समाजाच्या वतीने सफाई कामगाराचा सत्कार
कारंजा प्रतिनिधी नरेंद्र बोरकर ( कारंजा हुंकार )
सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमी लॉक डाऊन असुन शासनाच्या आदेशावरून सर्वत्र यात्रा महोत्सव व पुण्यतिथी उत्सव रद्द करण्यात आले आहे .त्याच अनुषंगाने शासनाच्या आदेशाचे काठेकोर पालन करून वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या कुंभार समाजाच्या वतीने कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्य कुंभारवाडा परिसरातील सफाई कामगारांचा सोशल डिस्टनचे पालन करून सत्कार करण्यात आला असुन सफाई कामगारांना मास्क व हँडवॉशचे वाटप करून कुंभार समाजाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली .....