केकतउमरा येथे कोरोना विषाणू बाबत सोशल डिस्टन्स नागरिकात जनजागृती नेहरू युवा मंडळाचा पुढाकार
स्वस्त धान्य दुकान, बँक,किराणा दुकान याठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवावे
कारंजा प्रतिनिधी नरेंद्र बोरकर ( कारंजा हुंकार )
वाशिम जिल्ह्यात येत असलेल्या ग्राम केकतउमरा येथील राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथे स्वस्त धान्य दुकान,बँक,किराणा दुकान आदि ठिकाणी सोशल डिस्टन्स बाबत नागरिकात जनजागृती करून कोरोना विषाणू बाबत माहीत देत आहेत.यावेळी नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादूर हे बँक याठिकाणी सर्व खातेदार,शेतकरी यांना समांतर अंतर ठेवण्यासाठी नागरिकाना कोरोना विषाणू बाबत माहिती सांगून जनजागृती करत आहेत.स्वस्त धान्य घेतांना नागरिकांनी एकमेकात समांतर अंतर ठेवावे व कोरोना बाबत नागरिकांनी गंभीर राहण्याचे आवाहन यावेळी प्रदिप पट्टेबहादूर यांनी केले आहे.नेहरू युवा मंडळ हे कोरोना विषाणू बाबत सोशल डिस्टन्स जनजागृती मोहीम नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा समनव्यक सम्यक मेश्राम,नेहरू युवा मंडळ अध्यक्ष केकतउमरा प्रविण पट्टेबहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत.यावेळी नेहरू युवा मंडळाचे सूरज पट्टेबहादूर,संदीप घोडे,सागर पट्टेबहादूर,शाम खडसे यांनी स्वतः सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांत कोरोना विषाणू बाबत जनजागृती केली.