निस्वार्थीआणि खरीखुरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा
सौ. उर्मिला गाडगे यांचा उपक्रम समाजातील महीलांना आवाहन
कोरोणाला लढा
देन्यासाठी आता पुढाकार घेवुन होईल तेवढे सहकार्य करावे
मंगरुळपीर प्रतिनीधी —अशोक राऊत ( कारंजा हुंकार )
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात देखील पोहचला असून शहरीच नव्हे तर अगदी ग्रामीण भागात देखील पहावयास मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासणाकडून विविध उपाययोजना तसेच जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असले तरीही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये शहराच्या तुलनेत शासकीय उपाययोजना पोहोचण्यास वेळ लागतो.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला या गावामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आणि लॉकडाऊन अधिकच कठोर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे हातांवर पोट असणाऱ्या मजूरवर्गावर मात्र जणू आभाळच कोसळले. शासनाच्या निर्देशानुसार आपल्या घरातच राहा,वारंवार हात धुवा, सॅनिटायजर चा वापर करा, मास्क वापरा वगैरे उपाययोजना करायच्या असता गरीबमजूर वर्गाच्या हाताला काम नाही, घरात अन्न नाही, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न समोर उभा असता मास्क व सॅनिटायजर तरी आणायचे कुठून ?
देशात आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी शासनासोबतच समाजातील जागरूक समाजसेवक, दान दाते पुढे आले आणि गरजूंना मदत करण्यासाठी धावले. मग यात महिला मागे कशा असतील? महिला सुद्धा बाहेर निघून या संकटाशी सामना करण्यास सरसावल्या आहेत.
अश्याच एक CMRC पातूर ग्रामिणच्या उपाध्यक्ष तसेच विद्यमान ग्रा.पं. सदस्य असलेल्या सौ.उर्मिला मोहन गाडगे यांनी देखील सामाजिक बांधिलकी दाखवत आपल्या परिसरातील गरजूंची मदत करण्यास पुढे आल्या. त्यांनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून पाठपुरावा करून वार्डातील नाल्या साफसफाई व वॉर्ड निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन वेळा सॅनिटायजरची फवारणी करून घेतली. त्याचबरोबर संपूर्ण वार्डात मास्क वाटप व सॅनिटायजरच्या बॉटलचे वाटप ग्रा.पं. च्या माध्यमातून केले. एवढ्यावरच ते थांबल्या नसून, गावातील काही नागरिक गुजरात येथे कामासाठी गेलेले असता लॉकडाऊन घोषित होताच गावाकडे परतले असता खबरदारी म्हणून त्यांना गावाबाहेरिल शाळेत विलगीकरणात ठेवले होते. त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी *सौ.उर्मिला गाडगे यांनी पाच हजारांची मदत केली, तसेच स्वतःच्या कुटुंबाला मिळालेले राशन देऊन मदत केली. अजूनही शक्य होईल तेवढी मदत त्या करत असून कोरोनाची साखळी तोडता यावी यासाठी जनजागृती करत आहेत*.