जुगार अड्डयावर पोलीसांची धाड
सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल , धनज पोलीसांची कारवाई
कामरगांव प्रतिनीधी धनराज उटवाल दि २५ कारंजा हुंकार
कामरगांव--- कोरोना संचारबंदी दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ब्राम्हणवाडा शिवारातील जुगार अड्डयावर 24 एप्रिल रोजी धनज पोलीसांनी धाड टाकून सहा जणंाविरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपीत रामेश्वर हिवराळे, विलास तुरक, आरीफ शहा हुसेन शहा, चिराग शहा मस्तान शहा, सलमान शहा मस्तान शहा व कैलास सावळे या सहाजणांचा समावेश असून हे सर्व जण ब्राम्हणवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर कलम 12 अ नुसार सहकलम 188 व 269 तसेच साथरोग अधिनियम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई कामरगाव चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के, पोलीस कर्मचारी शामल ठाकूर व दिपक खंडारे यांनी केली आहे.