काजळेश्वर परीसरात शेतकरी करत आहेत विहीरी .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी — नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
: काजळेश्वर परीसरातील कोरडवाहू शेतकरी निसर्गाने आवश्यकता असतांना पाणी नाही दिले तर संकटात येतो अशा वेळी आवश्यकतेनुसार पाणी पीकाला देता यावे करीता वीहीरी पोकलँन्ड मशीनद्वारा खोदतांना दिसत आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर परिसरातील शेतकरी ओलिताची शेती व्हावी करीता विहीरी खोदकामाकडे वळला आहे . त्याकरीता पोललॅन्ड मशीनचा वापर होत आहे . यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढली आहे .एका पाण्याने पीक जाने निसर्गाच्या लहरीपणासाठी पेरलेले पीक वाचावे करीता शेतकरी आटापिटा करीत आहे पाणी लागत असल्याने आनंदी होत आहे . त्याचा उल्हास वाढत आहे पीक काढण्याची उर्मी त्याला मिळत आहे . शेतकरी कष्टकरी आहेच पाणी असले तर जीवनमान उंचावेल या आशेने काम करीत आहे .
कोट: अनेकदा एका पाण्याने पीक गेले त्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य येते मात्र शेतात विहीरीला पाणी असले तर शेतकरी कष्टाने पीक वाचऊ शकतो . शिकलेले तरूण मुलांना नोकऱ्या नाहीत .ओलिताची शेती असली तर त्याचे जीवनमान उंचाऊ शकतो .
डिगांबर पाटील उपाध्ये शेतकरी काजळेश्वर .