जानोरी ग्रामपंचायत प्रशासन करणार
दिव्यांगाना निधीचे वाटप .
अनुदान थेट लाभार्थांच्या खात्यात .
जानोरी ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये कारंजा हुंकार
:कारंजा तालुक्यातील जानोरी गट ग्रामपंचायत कोरोणामुळे घरातच
असलेले असहाय दिव्यांग यांना
चौदाव्या वित्त आयोगातून आलेला
दिव्यांग निधी थेट लाभार्थ्यांचे खात्यात टाकून पारदर्शकता ठेवत दिव्यांगाना मदतीचा हात देण्यासाठी कार्यवाही करेल असे मत जानोरी सरपंच तथा ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केले आहे .
प्राप्त माहीतीनुसार कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये करीता
घरातच रहा त्यामूळ अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतांना दिव्यांग असहाय
यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून देय
असलेला निधी थेट लाभार्थी यांचे
खात्यात वळती करण्यासमंधी कार्यवाही करण्याचे जानोरी ग्रामपंचायत ठरवित आहे . तसा निर्णय देऊन पारदर्शकता आणि दिव्यांगाना आर्थिक आधार होईल असे मत सरपंच सौभारती नितीन
भिंगारे ;उपसरपंच राहूल इंगळे ग्रामसचिव गजानन उपाध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केले .