कारवाई टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांची तडकाफडकी बदली
पोलीस प्रशासनाची नवी खेळी, वाघमोडे यांची बदली वाशिम कंट्रोलरूमला
कारंजा लाड दि 23 कारंजा येथील शेतकरी तथा पत्रकार सुधीर देशपांडे हे कोरोना लाॅकडाऊन शिथिल वेळात आपल्या शेतात शेतीपयोगी साहित्य घेऊन जात असतांना मार्गातील कारंजा दारव्हा मार्गावरील विजकेंद्राजवळ त्यंची दुचाकी अडवून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी त्यांना विनाकारण अमानुष मारहाण केली. सदर घटनेचा कारंजा तालुक्यातील पत्रकारांनी एकजुटीने निषेध करीत कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हा पत्रकार संघाने देखील सदर प्रकरणाची दखल घेऊ
न जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री, गृहराज्यमंत्री व पत्रकार हल्लाविरोधी समितीचे समन्वयक यांच्याकडे दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय सुधीर देशपांडे यांनी सुध्दा कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक वाधमोडे यांच्यासह इतर दोन जणांविरूध्द तका्रर दाखल केली आहे. तसेच कांरजा तालुका पत्रकार संघाने सुध्दा पोलीस उपविभागीय अधिकारी , तहसिलदार व कारंजा शहर पेालीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे दोषी पोलीस अधिकार्यांविरूध्द कारवाईसाठी निवेदन सादर केले. यावरून वाघमोडे हे सदर प्रकरणी पूर्णपणे दोषी असल्याचे निदर्शनास आल्याने व त्यांना कोणीही वाचवु शकत नाही याचा अंदाज आल्याने त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी त्यांची तडकाफडकी रातोरात बदली केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांची सध्या वाशिम कंट्रोलरूमला बदली करण्यात आली. एकीकडे देशपांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल अशी भुमिका कारंजा शहर पो स्टे चे ठाणेदार पाटील यांनी घेतली. तर दुसरीकडे वरिष्ठांना विश्वासात न घेता देशपांडे यांच्यावर मात्र ग्रामीण पोलीसांनी शासकिय कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केल्याने पोलीस प्रशासनाच्या दुहेरी भुमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच पोलीस आपल्या कर्तव्याशी इमान राखून कार्य करीत आहे का ? शिवाय देशपांडे यांच्यावर गुन्हे दाखल करतांना गा्रमीण पोलीसांना वरिष्ठांशी चर्चा करावी असे वाटले नाही का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहे. या सर्व घडामोडीत अखिल भारतीय मराठी राज्य अध्यक्ष एस एम देशमुख व सदस्य किरण नाईक व जिल्ह्याध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी प्रयत्न केले.
जिल्हापोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार कारंजा ग्रामीण पो स्टे मध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघमोडे यांची वाशिम कॅन्टोल रूम ला 22 एप्रिल रोजी बदली झाल्यावरून 2 वाजता त्यांची रवानगी करण्यात आली.*
ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन डी. बी.इंगळे