संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी 60 वाहन धारकांवर कारवाई.
धनज बु प्रतीनीधी अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
धनज बु काम नसता बाहेर निघणाऱ्या व जिल्हा सीमा उल्लंघन करणाऱ्या 60 जणांविरुद्ध धनज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.धनज बु।। येथून अमरावती जिल्ह्याची तसेच कामरगाव येथुंन अकोला जिल्ह्याची सीमा जवळ असल्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहानाची येजा सुरु होती..संचार बंदी लागू असता ना देखील अशाप्रकारे बिनदास्त फिरणाऱ्या वाहनाधारकांवर धनज पोलिसानी कारवाई केली आहे..कोरोना व्हायरस च्या वाढत्या संसर्गाचा आळा घालण्यासाठी शासनाकडून देशभरात लॉक डॉऊन करण्यात आले आहे.तसेच लोकांना घरात राहण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सुद्धा काही लोक काम नसताना आणि अत्यावषक वस्तूं खरेदीच्या नावाखाली बाहेर येत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे हे वाहन ताब्यात घेऊन त्यांचावर भादवि च्य कलम 188 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तरी कोणी हि संचारबंदी चे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांचावर कठोर कार्यवाई केली जाईल असा इशारा ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी दिला