आरोग्य पथकास कोरोणा संरक्षक किट ग्रामपंचायत कडून वाटप
काजळेश्वर नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये :लॉक डाऊन काळात जीवाची पर्वा न करता खबरदारीची दक्षता घेत काजळेश्वर
ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कोरोणा वारीयर काजळेश्वर आरोग्य पथकास ग्रामपंचायत प्रशासना कडून आरोग्यरक्षक किट
जीप . काजळेश्वर सर्कलचे सदस्य
अशोकराव डोंगरदीवे त्यांच्या हस्ते दि .२४ एप्रील रोजी देण्यात आली .
प्राप्त माहीतीनुसार कोरोणा विषाणू संसर्ग टाळण्याकरीता जनजागृतीपासून तपासणी पर्यन्त तसेच ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळण्यास योग्य उपाययोजना करणारे काजळेश्वरवासीयांना माझ्या
आरोग्याचा मीच रक्षक हा आरोग्यमंत्री यांचा संदेश ग्रामस्था पर्यन्त पोहोचविनारे आरोग्य पथक तसेच शासनाच्या सूचना सांगणारे गावकऱ्यासाठी
तळमळीने काम करणारे येथील डॉ . प्रशांत वाघमारे ;आरोग्य रक्षक ए.जी सोनोने आरोग्य कर्मचारी
संदीप खुळे : कैलास उपाध्ये ' योगिता वानखडे ;मंजू जाधव ;आशा
वर्कर ' ; आंगणवाडी सेवीका यांना ग्रामविकास अधिकारी आर.आर.
मुळे यांचे पुढाकारात ग्रामपंचायत
मंडळाचे मार्गदर्शनात जीप. सदस्य
अशोकराव डोंगरदीवे ह्यांचे हस्ते माजी जीप. सदस्या सौ . ज्योती ताई गणेशपूरे : पंस सदस्य रंगराव धुर्वे
यांचे उपस्थितीत कीटचे वाटप करण्यात आले .कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही काम करत राहू
असे डॉ . वाघमारे याप्रसंगी म्हणाले .