डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा.
आशिष धोंगडे संविधान प्रचारक
वाशिम:- सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशाने विविध उपाययोजना केल्या आहेत.त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे आपला संपूर्ण भारत देश हा लॉकडाऊन केला आहे.यामुळे ह्या कोरोना विषाणू संसर्गजन्य जी साखळी आहे ती तुटण्याला मदत होते. म्हणून केंद्रसरकार,राज्यसरकार ने सर्व सामाजिक,धार्मिक सण,उत्सव,यात्रा,मेळावे इत्यादी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून सोशल डिस्टस्टिंग करण्याचे ठरविले आहे.म्हणून जेव्हा,जेव्हा या देशावर संकट आली आहेत तेंव्हा तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संकटसमयी मदत करून या देशाला प्रथम प्राधान्य देत मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत:भारतीय आहे.एवढे या देशाबद्दल प्रेम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होते. आणि त्यांचीच जयंती यावर्षी 14 एप्रिल या संकट परिस्थितीत आज आहे.म्हणून आज रोजी जे देशावर मोठे संकट आहे प्रथमतःआपण आपल्या देशावर आलेले संकट घालवूया,मग भिमजयंती मोठया उत्साहात साजरी करूया,असे भावनिक आवाहन राजा प्रसेनजीत अनुभव शिक्षा केंद्रचे वाशिम जिल्हा समन्वयक आशिष धोंगडे संविधान प्रचारक यांनी प्रसिद्धीपत्रकातून तमाम जनतेला केले आहे.पुढे संविधान प्रचारक आशिष धोंगडे म्हणाले की,यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्या घरातच पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर नतमस्तक होऊन,त्रिशरण, पंचशील ग्रहण करावे,पुष्पहार घालून, मेणबत्ती लावून,अतिशय संवेदनशील वातावरणात जयंती साजरी करून आपल्या देशावर आलेले कोरोना संकट घालवण्यासाठी आपण पूर्णपणे कटीबद्द असल्याची शपथ घेऊन शासन,प्रशासनाला सहकार्य करण्याचा विडा उचलावा.या दिवशी आपण घरातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी,त्यांचे जिवन चरित्र,व इतरही पुस्तक वाचावे,म्हणजे यावर्षी नाचून नाहीतर वाचून भीमजयंती साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आशिष धोंगडे यांनी केले आहे.एवढेच काय तर ज्या गावात भीम जयंतीनिमित्त काही मदत जमा केली असेल तर ती मदत यावर्षी जे आज भुकेने गरीब कुटुंब व्याकुळ आहेत,त्यांना अन्नधान्य मिळत नाही,किंवा जे बाहेर जिल्ह्यातील कामगार,मजूर,विद्यार्थी विविध ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना या मदतीतून त्यांची भोजनाची व्यवस्था करावी,तथा आपल्याच गावातील काही गरीब कुटुंब आज हतबल झाले त्यांना मदत करावी.अशा पद्धतीने जर यावर्षी भीमजयंती आपण साजरी केली तर नक्कीच या जगात एक आगळा वेगळा भिमजयंतीचा संदेश जाण्याला मदत होणार असल्याचा विश्वास देखील अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा समन्वयक आशिष धोंगडे संविधान प्रचारक यांनी व्यक्त केला.