काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वर आयुर्वेदीक दवाखाना तसेच आरोग्य वर्धीनी उपकेंद्र अंतर्गत डॉ . प्रशांत वाघमारे यांचे आरोग्य पथक दि .१० एप्रील ला गुड फ्रायडेची शासकीय सुटी असूनही गावातील गरजूची रुग्णसेवेत कार्यान्वीत होते .
प्राप्त माहितीनुसार कोरोणा विषाणूमुळ ग्रामस्थ भयभीत आहे .थोडा जरी सर्दी खोकला घसा खवखणे वाटले की भीतीपोटी डॉक्टरांचा आधार वाटतो त्या दृष्टीने येथील आरोग्य पथकाचे डॉ . प्रशांत वाघमारे ' आरोग्य कर्मचारी ए.जी सोनोने ;संदीप खुळे ;कैलास उपाध्ये
योगीता वानखडे : मंजू जाधव हे गावचे आधारवड बनले आहेत . सुटीच्या दिवशीही त्यांनी महानगरातून आलेल्यांच्या घरी जाऊन कोरोनासंदर्भात काही लक्षणे
दिसतात काय याबाबत पाहणी केली . आणि दवाखान्यात आलेल्या
ची तपासणी करुन त्यांना वैघकीय सल्ला दिला . घरीच थांबा : अनावश्यक फिरु नका वारंवार हात धुवा ;सामाजिक अंतर ठेवा आणि शिंकतांना खोकतांना तोंडावर मास अथवा रुमाल ठेवा याबाबत त्यांची
कोरोणा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जनजागरण चालूच ठेवले आहेगावात डॉक्टर असल्याचा आधार गावकऱ्यांना वाटतो .
शासकीय सुटी असूनही काजळेश्वरचे आरोग्य पथक रूग्णसेवेत अवीरत