विस्थापीताच्या अन्न वस्त्र निवारा करीता नितेश सरोदे यांनी दिला मदतीचा हात .
अकरा हजार रूपयाचा धनादेश
तहसीलदार कारंजा यांचे कडे सूपुर्द .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये कारंजा हुकार
: येथून जवळच
असलेल्या भडशिवणी येथील सधन शेतकरी
नितेश तुकाराम सरोदे यांनी दि .२३एप्रील रोजी गरजूंच्या अन्न वस्त्र निवाराकरिता खारीचा वाटा म्हणून
अकरा हजार रूपयाचा धनादेश कारंजा तहसीलदार धीरजमांजरे
यांचे कडे सूपुर्द केला .
शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सध्या देशात को वीड१९ महामारीचे संकट देशासमोर
राज्यासमोर आहे यावर प्रतीबंधात्मक खबरदारी करीता सर्व लॉक डाऊनमधे आहे . त्या मुळे अन्न
वस्त्र निवारा सहारा देण्याकरिता सहाय्यता निधी शासन जमा करीत आहे . शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नितेश सरोदे यांनी तहसीलदार कारंजा धीरज मांजरे यांचेकडे अकरा हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द केला आहे . त्यावेळी नितेश सरोदे यांचे सह
संतोष घुले विळेगाव ;उपसरपंच राजु
भटकर ;इत्यादींची उपस्थीती होती .