लॉकडाऊनच्या कालावधीतही शहरी व ग्रामीण भागात हातभट्टीची दारू, व खर्रा विक्री जोमात सुरू 400 रु .किलोची सुपारी 750 रु किलो
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार )
वाशीम जिल्हात व कारंजा शहर व ग्रामीण भागात लाकडाऊनच्या काळातही अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र दिसत आहेत.आजच्या घडीला देशातच नव्हे तर संपुर्ण जगातच कोरोना-१९ चा प्रादुर्भाव सुरू असुन, यावर शासनाने संसर्गजन्य रोग पसरू नये,याकरीता कलम-१४४ लागु केलेले आहे.या कलमाणव्ये जमाव बंदीस आळा घालता यावे म्हणून बरीचशी दुकाने,गाळे, अवैद्य धंदे व इतर अशी बरीच कामे बंद करण्यात आली.मात्र तरीसुद्धा या सर्व नियमांना धाब्यावर बसवून अवैध धंदे सुरू आहेत.जसे,हातभट्टीची म्हणजे मोहफुलांची दारू विक्री जोमात सुरू आहे.लाकडाऊनच्या सुरुवातीला हीच दारू सस्ती मिळायची,मात्र आत्ता ही दुप्पट भावाने मिळत आहे . तरीपण लाकडाऊनच्या काळात दारू पिण्यासाठी तळीरामांच्या रांगाच-रांगा लागलेल्या असतात .तसेच ग्रामीण भागातील खर्रा खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.या महागाईच्या काळात सुपारी -७५० रुपये किलो किंमतीचे व सुगंधीत तंबाखूच्या किंमतीत अफाट अशी वाढ झालेली असून सुद्धा खऱ्याच्या आहारी लहान मुले-मुली,स्त्रिया,तरुण पिढी व इतर अशी बरीच मंडळी गेल्याचे समजते.
या सर्व बाबींचा विचार करता याकडे गाम्भीर्य पूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.