काजळेश्वरात हळद उकळण्याची प्रक्रीया अंतीम टप्प्यात हळद पॉलीश साठी शेतकरी करीत आहे तयारी .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वर येथील काही तरुण शेतकऱ्यांनी हळद पेरणी या वर्षी पहील्यांदाच
केली .ओल्या हळदीला बाजार भाव
कमी असल्याने हळद सुकऊन तीला
बाजारात विकावे करीता येथील शेतकरी हळदीवरच्या प्रक्रीया करतांना दिसत आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर येथील तरूण शेतकरी गटाने हळदीची पेरणी केली एप्रील महीन्यात ट्रॅक्टरच्या मदतीने व मजूराचे सहाय्य घेऊन हळद वेचणी केली . ओल्या हळदीला मार्केट मधे
चांगला भाव मिळत नसल्याने येथील
शेतकरी गटाने बॉयलरच्या सहाय्याने
हळद उकळीचा कार्यक्रम घेतला
हळद उकळणे अंतीम टप्प्यात असून ती सुकविण्याचे काम सुरू आहे त्यानंतर पॉलिश हळदीला मारल्या
नंतर हळदीला चांगला बाजार भाव मिळेल अशी आशा असल्याचे
येथील युवा शेतकरी नितीन पा उपाध्ये म्हणाले . हळदीची शेती करणाऱ्यात प्रवीण उपाध्ये ;मणीष अग्रवाल ;राजू फरास ' डॉ. विशाल उपाध्ये ; नितीन पा उपाध्ये गोपाल उपाध्ये इत्यादींनी हळदीची प्रायोगिक शेती केली . या पिकाला वण्य प्राण्याचा त्रास नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले .